Pahalgam Terror Attack Saam Tv News
देश विदेश

दहशवाद्यांच्या निशाण्यावर पर्यटनस्थळं, पहलगाम हल्ल्यात नवा ट्विस्ट; पहलगाम हल्ल्यानंतर कुठे गेले दहशतवादी?

Pahalgam Terror Attack : पहलगामसोबतच काश्मीरच्या घाटीत रक्ताचा सडा पाडण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन समोर आलाय... मात्र किती पर्यटनस्थळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Prashant Patil

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठा ट्विस्ट समोर आलाय. दहशतवाद्यांना फक्त पहलगामचं नाही तर जम्मू काश्मीरमधील इतरही पर्यटनस्थळावर रक्ताचा सडा पाडायचा होता. मात्र सुरक्षा दलाच्या चोख बंदोस्तामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. या हल्ल्यासाठी पाकनं दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याची ही माहितीय. मात्र पहलगाम हल्ल्याआधी हे दहशतवादी कुठे लपवून बसले होते. त्यांनी भारतात घुसखोरी कधी केली? यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलीय.

काय होता ना'पाक' प्लॅन?

हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये

एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन

बैसरन, आरु व्हॅली, अॅम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी

सुरक्षा कडक असल्यानं इतर 3 ठिकाणी हल्ला टळला

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्याबाबत जवळपास 2500 हजाराहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. त्यात NIAनं 80 स्थानिक कामगारांची चौकशी केली. ज्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आलेत. त्यातील 4 स्थानिक कामगार पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकीसाठी मदत करत असल्याची माहितीये. मात्र दहशतवाद्यांच्या आकांनी त्यांना काय निर्देश दिले होते. पाहूयात

आकाने सांगितलं, दहशतवाद्यांनी ऐकलं !

शस्त्र,माहिती देण्यासाठी कमी वर्दळीची जागा निवडा

स्मशानभूमी आणि उद्यानात रचला जायचा प्लॅन

शस्त्र ठरलेल्या वेळेत पोहोचवण्यासाठी नियोजन

दहशतवाद्यांना हातात घड्याळ आणि पायात बूट घालण्याचे निर्देश

शस्त्रास्र ड्रॉप करण्यापूर्वी सांकेतिक भाषेचा वापर

इस्लामिक पोशाख परिधान न करण्याच्या सूचना

शस्त्र ठेवण्याची जागा निवासस्थानापासून दूर ठेवण्याचे निर्देश

दहशतवाद्यांनी पहलगामसह इतर ठिकाणीही विध्वसं घडवून आण्याचा प्लॅन रचला होता. मात्र दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे भारतीय लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे उद्धवस्त झाले. आता भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत ते या दहशतवाद्यांचे आका...ते कोणत्याही बिळात लपलेले असू दे, त्यांना शोधणार आणि ठोकणार कारण ये नया भारत है...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT