Afghanistan: अंदाधुंद गोळीबारात तालिबानचा टॉप कमांडर ठार Saam Tv
देश विदेश

Afghanistan: अंदाधुंद गोळीबारात तालिबानचा टॉप कमांडर ठार

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या २ बॉम्बस्फोट आणि गोळीबारमध्ये २५ जण ठार झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची Afghanistan राजधानी असलेल्या काबूलमध्ये Kabul झालेल्या २ बॉम्बस्फोट आणि गोळीबारमध्ये २५ जण ठार झाले आहेत. काबूल मधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात Military Hospital बंदूकधाऱ्यांच्या गटाने हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे, असे सांगण्यात येतं आहे. हल्लेखोर नंतर तालिबानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले आहे.

यादरम्यान तालिबानचा टॉप कमांडर मौलवी हमदुल्ला मुखलिसही Maulvi Hamdullah Mukhlis मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. याला एएफपी न्यूज एजन्सीनंही AFP News Agency दुजारा दिला आहे. तो तालिबानच्या काबूल मिलिटरी कॉर्प्सचा प्रमुख होता. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, की ४०० खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंदुकधारी गटाने हल्ला केला आहे. ज्यामध्ये सर्वजण १५ मिनिटांत मारले गेले आहेत. त्यानंतर तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरने हॉस्पिटलच्या आवारात सोडण्यात आले आहे. यामुळे हल्लेखोरांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखले गेले होते आणि सर्वांना गेटवर गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

तालिबानच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे, की या हल्ल्यात २५ लोक ठार झाले, असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. परंतु, अधिकृत जीवितहानी झाल्याची पुष्टी झाली नाही. काबुल मिलिटरी कॉर्प्सचे प्रमुख मौलवी हमदुल्ला मुखलिस हे मृतांमध्ये सामील असल्याचे तालिबानच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT