ठाणे : ठाण्यातील Thane कळवा परिसरात क्रूरतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत पेटवले आहे. या भयावह घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पीडितेवर मुंबई मधील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास कळवा पोलीस करत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. अनिल चौरासिया असे अटक केलेल्या ३५ वर्षीय आरोपी पतीचे नाव असून तो कळवा परिसरामधील रहिवासी आहे. आरोपी अनिल आणि त्याची जखमी पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी अनिल याने अन्य एका तरुणी बरोबर विवाह केल्याचा संशय जखमी पत्नीला होता.
हे देखील पहा-
यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. दरम्यान, ३० ऑक्टोबर दिवशी दोघांत परत एकदा वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यावर संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले आहे. पीडित महिला ६ महिन्यांची गर्भवती असून देखील आरोपीने तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपी पतीने रॉकेल टाकून पेटवल्यामुळे पीडित महिला गंभीररित्या भाजली होती.
या धक्कादायक प्रकरणानंतर शेजाऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, पीडित महिलेचे संपूर्ण शरीर भाजल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पती विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर दिवशी कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.