Ali Larijani death ANI
देश विदेश

सर्वात मोठी बातमी! इराणचा सर्वात शक्तिशाली नेता इस्रायली हल्ल्यात ठार; मुलाचाही मृत्यू, तेहरानमध्ये खळबळ

Ali Larijani death : इराणचे वरिष्ठ नेते अली लारीजानी इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel conflict news : आखाती देशातील युद्ध (West Asia Conflict) आता एका अतिशय भयंकर वळणावर पोहोचले आहे. इराणचे सर्वात शक्तिशाली आणि अनुभवी नेते अली लारीजानी (Ali Larijani) यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात (Israeli Airstrike) मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात लारीजानी यांच्यासोबत त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला असून, इराण सरकारने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून इराणच्या राजकारणात आणि धोरणांमध्ये (Geopolitics & Policy) महत्त्वाची भूमिका बजावणारे लारीजानी हे इस्रायलच्या रडारवर होते.या हल्ल्यानंतर आता इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला (Escalation) जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता इराण काय पाऊल उचलणार (Retaliation) याकडे लागले आहे.

लारीजानी हे इरणच्या सुरक्षा परिषदेचे सचिव होते. माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर ते पडद्याआडून इराणचा कारभार चालवत होते असे म्हटले जात होते. एएफपीनं वृत्तानुसार, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने लारीजानी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लारीजानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि बॉडीगार्डही ठार झाले. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने लारीजानी यांना शहीद म्हटले आहे, लारीजानी यांनी आपले संपूर्ण आयुष्य इस्लामिक प्रजासत्ताकाची सेवा केल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सर्वप्रथम लारीजानी यांच्या मृत्यूची घोषणा केली. इस्रायली लष्कराने सांगितले की, इराणच्या एलिट बसिज फोर्सचे कमांडर अली लारीजानी हे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही मंगळवारी संध्याकाळी लारीजानी यांच्या मृत्यूची घोषणा केली.

कोण होते अली लारीजानी?

  • अली लारीजानी हे इराणच्या अंतर्गत वर्तुळातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जात होते.

  • अली लारीजानी यांचा प्रभाव राजकारण, सुरक्षा आणि राजनैतिक क्षेत्रात पसरलेला होता.

  • अली लारीजानी इराणच्या एका प्रमुख राजकीय घराण्यातील होते.

  • अली लारीजानी यांची तुलना अमेरिकेतील केनेडी घराण्याशी केली जात असे.

  • त्यांचे भाऊ सादेक लारीजानी यांनी न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून काम पाहिले, तर मोहम्मद जहाब लारीजानी हे परराष्ट्र धोरणाचे वरिष्ठ सल्लागार होते.

  • अली लारीजानी यांनी २००८ ते २०२० पर्यंत इराणच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या ते इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते.

  • अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अली लारीजानी पडद्याआडून देशाचा कारभार चालवत होते असे म्हटले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT