Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल, आजचे नवीनतम दर तपासा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. दररोज प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. असे असले तर दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. (Petrol Diesel Latest Price)

आज हरियाणामध्ये पेट्रोल 97.64 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे येथे पेट्रोल (Diesel) 0.40 पैश्यांनी महागले आहे. त्याचवेळी राज्यात डिझेलचा दर 0.39 पैश्यांनी वाढून 90.47 रुपये प्रति लिटर झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 0.63 पैश्यांनी महागले असून ते 96.89 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.61 पैश्यांनी वाढून 87.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. (Tajya News)

याशिवाय जम्मू-काश्मीर, केरळ आणि ओडिशामध्येही इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचवेळी पश्चिम बांदलमध्ये आज पेट्रोल 0.44 पैश्यांनी स्वस्त होऊन 106.82 रुपये प्रतिलिटर झाले आहे. येथे डिझेलची किंमत 0.41 पैश्यांनी घसरून 93.49 रुपये प्रति लीटर झाली आहे. बंगालशिवाय तामिळनाडू, राजस्थान आणि गोव्यातही पेट्रोल थोडे स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT