Leopard : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे वास्तव्य धोक्यात; अपघातांच्या प्रमाणात वाढ

बिबट्याच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना नाही
Leopard
LeopardSaam Tv
Published On

पुणे - राज्यातल्या राजकारणातला संघर्ष आणि आरोपांचे घाव आणि डावपेज तुम्ही रोजच पहाताय असाच संघर्ष उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातल्या जुन्नर आंबेगाव खेड,शिरुर तालुक्यात शेतकरी आणि बिबट्यांचा सुरु आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या खेड आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यातल्या बिबट्यांची संख्या 550च्या पुढे गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Leopard
Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक

या बिबट्यांचा (Leopard) रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांशी (Farmer) संघर्ष सुरु असून बिबट्यांचे दररोज पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले होताना पहायला मिळतात. अशातच बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात अपघातही होत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

बिबट्या हा प्रथम श्रेणीत येणारा निशाचर. अत्यंत लाजाळू, मिळेल त्या जागेत राहणारा व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी. वृक्षतोडीमुळे या बिबट्याने उसाच्या फडाला जंगलाची सावली समजून बिबट्यांनं लोकवस्तीत ठाण मांडली, पोषक वातावरण, मुबलक खाद्य, निवारा आणि सुरक्षित पणा मिळाल्याने बिबट्याच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढत होऊ लागल्याचे अभ्यासक सांगतात. (Tajya News)

2001 पासून जुन्नर आंबेगाव परिसरात बिबट्याची समस्या जाणवू लागली, आज 22 वर्षात या बिबट्यांच्या आकडेवारीतली होणारी घट चिंतेचा विषय बनला आहे. बिबट्यांचा अपघाती आणि दुदैवी मृत्युचे प्रमाण वाढतं आहे. तर दुसरीकडे मादी चार ते पाच बछड्यांना जन्म देत आहे आता ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने बिबट्याच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leopard
Chandrapur News: उद्घाटनावेळी मंत्री-खासदारांमध्ये वाद; मुनगंटीवार यांना धानोरकरांनी कार्यक्रमातच सुनावले, कारण?

गेल्या 30 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 36 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर 08 हुन अधिक व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर 12 हजारांपेक्षा पशुधनाची शिकार झाली आहे. तर दुसरीकडे बिबट्याच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ आज चिंतेचा विषय बनला आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढतोय, अशातच बिबट आणि माणसांचा संघर्ष कमी होताना दिसत नाहीय.

माणसांच्या नकळत वस्तीशेजारी बिबट्या वर्षानुवर्षे राहत आला आणि यापुढेही तो राहणार असून पुढील काळात बिबट्याचे लोकवस्तीलगतचे वास्तव्य आणि वाढती संख्या रोखणं गरजेचं जरी असले तरी संघर्ष मात्र टाळला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com