Authorities carry out demolition of a five-storey office linked to TMC MP Abhishek Banerjee saam tv
देश विदेश

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

Bulldozer Action on MP Office: टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती.

Bharat Jadhav

  • अभिषेक बॅनर्जी कार्यालयावर बुलडोझर कारवाई

  • अनधिकृत बांधकामामुळे कार्यालय जमीनदोस्त

  • दक्षिण 24 परगणा येथील पाच मजली इमारतीवर कारवाई

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर करावाई करण्यात आलीय. दक्षिण २४ परगणा येथील आमतला येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयावर ही कारवाई केली गेली. हे कार्यालय कोणत्याही परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आलंय. त्यावरूनच ही कारवाई करण्यात येत आहे. अभिषेक बॅनर्जी यांची पाच मजली इमारत आता जमीनदोस्त केली जात आहे. याआधी ३० जूनला अभिषेक बॅनर्जी यांना एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावर खासदारकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाबाहेर सध्या तीन बुलडोझर आहेत. त्याच्यामार्फत पाडकाम केलं जातंय. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून हे कार्यालय बंद होते. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हे कार्यालय बेकायदेशीरपणे उभारण्यात आले होतं. ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय बांधले गेले होतं. नोटीस बजावल्यानंतरही कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती.

अमतला कार्यालयावर झाली बुलडोझर कारवाई

अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बरचे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांचे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील अमतला येथील कार्यालय पाडण्याची कारवाई केली जातेय. शनिवार दुपारपासूनच या कार्यालयाबाहेर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांची उपस्थिती दिसून येत होती. ही पाडकाम मोहीम सुरू होण्यापूर्वीच तिथे तीन बुलडोझर आणण्यात आले होते.

दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने ३० जून रोजी अभिषेक बॅनर्जी यांच्या आमतला येथील कार्यालयाला सर्वप्रथम नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे कार्यालयाच्या बांधकामाशी संबंधित विविध कागदपत्रे आणि परवानग्यांबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. त्यानंतर ७ जुलै रोजी आणखी एक नोटीस बजावण्यात आली. त्यासोबतच या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी १५ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT