What is the national animal and bird of India? Government Answer in Parliament SAAM TV
देश विदेश

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळेल?; संसदेत भाजप खासदाराच्या प्रश्नाला सरकारनं दिलं उत्तर

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Parliament Monsoon Session Updates : वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी संसदेत सांगितलं.

गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यासंदर्भातला मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी उपस्थित करण्यात आला. भाजपचे खासदार भागीरथ चौधरी यांनी सांस्कृतिक मंत्रालयाला उद्देशून यासंदर्भात सभागृहात प्रश्न विचारला. (Latest Marathi News)

सरकार (Government) गोमातेला (गाय) राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देणार का? असं विचारतानाच, त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या एका टिप्पणीचा संदर्भ दिला. त्यावर जी किशन रेड्डी यांनी उत्तर दिलं. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा विचार नाही, असं रेड्डी म्हणाले.

भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गोमातेला सरकार मान्यता देणार का? राष्ट्रीय प्राणी म्हणून संसदेत कायदा आणून भारतीय संस्कृतीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवनावर विचार केला जात आहे का? अलाहाबाद आणि जयपूर उच्च न्यायालयाने गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचा आदेश दिला होता आणि यासंदर्भात टिप्पणी केली होती. यासंदर्भात काही पावले उचलली जात आहेत का? असे प्रश्न खासदार चौधरी यांनी संसदेत उपस्थित केले. (Parliament Monsoon Session 2023)

संसदेच्या सभागृहात खासदार चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री रेड्डी यांनी उत्तरे दिली. भारत सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. त्यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या अनुसूची - I 1972 मध्ये समाविष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.

रेड्डी म्हणाले की, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाने गोवंश आणि त्यांचा विकास, संरक्षणासाठी 'राष्ट्रीय गोकुल मिशन' सुरू केले आहे. त्यामुळे गोवंशासह देशी जातींमध्ये वाढ होत आहे. विभागाने गाय आणि वासरांसहित जनावरांच्या सुरक्षेसाठी भारतीय पशू कल्याण बोर्डाचीही स्थापना केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT