Telangana Assembly Election SAAM TV
देश विदेश

Nagpur Vijayawada Corridor: नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरद्वारे जोडली जाणार तीन राज्ये, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Satish Kengar

Telangana Assembly Election:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी तेलंगणा राज्यासाठी 13,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि चांगलं शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांनी यावेळी केली.

सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''येणारे दिवस सणांचे आहेत. सणासुदीला सुरुवात झाली आहे. नवरात्र काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, पण आम्ही आधीच नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी करून शक्तीपूजनाची भावना व्यक्त केली आहे. आज तेलंगणामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे.''

ते म्हणाले की, 13,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मी तेलंगणाचे अभिनंदन करतो. आज असे अनेक रस्ते जोडणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, जे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील अनेक मोठे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणातून जात आहेत. सर्व राज्यांना पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांशी जोडण्याचे हे माध्यम बनणार. (Latest Marathi News)

नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरद्वारे तीन राज्ये जोडली जाणार: पंतप्रधान मोदी

नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरद्वारे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाहतूक सोयीस्कर होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे या तिन्ही राज्यांतील व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळेल. या कॉरिडॉरमध्ये आर्थिक केंद्रांची ओळख देखील करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, आज मी तेलंगणाच्या भूमीवरून घोषणा करत आहे की, केंद्र सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन National Turmeric Board स्थापना केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT