Avalanche Near Siachen saam tv
देश विदेश

Avalanche Near Siachen : दुर्दैवी घटना! हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ३ जवान शहीद

Siachen Avalanche : सियाचिनमध्ये हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत चौकीवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. या घटनेनंतर लष्करानं बचावकार्य हाती घेतलं.

Nandkumar Joshi

  • लडाखच्या सियाचिन भागात हिमस्खलन

  • तीन भारतीय जवान शहीद; त्यात दोन अग्निवीर

  • भारतीय लष्कराकडून बचावकार्य सुरू

लडाखच्या सियाचिनजवळ हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. त्यात दोन अग्निवीर आहेत. हिमस्खलनात चौकी दबली. याच चौकीत तीन जवान गस्तीवर होते. लष्कराकडून तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. हे तिन्ही जवान महार रेजिमेंटचे होते. ते मूळचे गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील रहिवासी होते.

हिमस्खलनात आणखी पाच जवान अडकले आहेत. एका कॅप्टनना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर लष्कराने बचावकार्य हाती घेतले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साधारण १२ हजार फूट उंचावरील सियाचिनमध्ये हिमस्खलन झालं. त्यात दोन अग्नीवीरांसह तीन सैनिक अडकले. त्यानंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. हिमस्खलनात अडकलेल्या तिन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. तेथील परिस्थितीशी सामना करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराकडून या भागात तैनात सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा प्रोटोकॉलची समीक्षा करण्यात येत आहे.

याआधी २०२१ मध्ये हनीफ भागात हिमस्खलनाची घटना घडली होती. त्यात दोन जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर बचावकार्य राबवण्यात आले. सहा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर अन्य सैनिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. २०१९ मध्येही १८००० फूट उंचावरील एका चौकीजवळ गस्त घालणाऱ्या चार सैनिकांसह अन्य दोन जणांचा हिमस्खलनात मृत्यू झाला होता. २०१६ मध्येही १९६०० फूट उंचावर हिमस्खलनाची दुर्घटना घडली होती. त्याखाली १० जवान दबले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT