भाजपचा माजी आमदार, तत्कालीन पोलीस अधीक्षक, ९ कॉन्स्टेबलसह १४ जणांना जन्मठेप; २०१८ मध्ये घडलेलं नेमकं प्रकरण काय?

Former BJP MLA Life Imprisonment : २०१८ मध्ये अपहरण आणि बिटकॉइनच्या माध्यमातून कोट्यवधीच्या खंडणी प्रकरणात अहमदाबादच्या कोर्टानं भाजपच्या माजी आमदारासह १४ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये अमरेली जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक देखील आहेत.
Ahmedabad court verdict in kidnapping Case
Ahmedabad court verdict in kidnapping Case saam tv
Published On
Summary
  • भाजपच्या माजी आमदारासह १४ जणांना जन्मठेप

  • अहमदाबाद कोर्टाने सुनावली शिक्षा

  • २०१८ मध्ये व्यावसायिकाचं अपहरण आणि खंडणी प्रकरणात दोषी

  • दोषींमध्ये माजी पोलीस अधीक्षक आणि ९ कॉन्स्टेबलचाही समावेश

अहमदाबादच्या न्यायालयानं २०१८ साली झालेल्या अपहरण आणि बिटकॉइनमधून कोट्यवधींच्या खंडणीच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नलीन कोटडियासह १४ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये अमरेली जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल यांचाही समावेश आहे.

अहमदाबाद सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बीबी जाधव यांनी कोटडिया, पटेल यांच्यासह १४ जणांना ही शिक्षा सुनावली आहे. २०१८ मधील एका अपहरण प्रकरणात या सर्वांना न्यायालयानं दोषी ठरवले. माजी आमदार कोटडियासह सर्व आरोपींनी सूरतचे बांधकाम व्यावसायिक शैलेश भट्ट आणि त्यांच्या पार्टनरचं गांधीनगरमधून अपहरण केले होते. त्यांच्याकडून ३२ कोटी रुपये मूल्याचे २०० बिटकॉइन खंडणी स्वरुपात घेतले होते.

Ahmedabad court verdict in kidnapping Case
Crime News: भयंकर! तांत्रिकानं आजोबाचं डोकं फिरवलं; चार दिशेला फेकले नातवाच्या शरीराचे तुकडे

कोण आहेत कोटडिया?

अपहरण आणि खंडणी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला भाजपचा माजी आमदार कोटडियाने अमरेली जिल्ह्यातील धारी मतदारसंघाचं २०१२ ते २०१७ या कालावधीत प्रतिनिधित्व केले आहे. एकूण १५ आरोपींपैकी १४ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. तर विपिन पटेल नावाच्या आरोपीची निर्दोष सुटका झाली होती. २०० बिटकॉइन वसुलीचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यात अमरेली पोलीस विभागातील ९ पोलीस कॉन्स्टेबल देखील आहेत.

Ahmedabad court verdict in kidnapping Case
NARI 2025 Report : मुंबई महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर, पण ४० टक्के महिलांनी सांगितलं भयावह वास्तव, आकडेवारी चिंताजनक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com