Rahul Gandhi
Rahul Gandhi saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Threat News : राहुल गांधींना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात मिळालं पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

doRahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. इंदूर पोलीस (Indore Police) आणि गुन्हे शाखेचे पथक हे पत्र ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात राहुल गांधी यांना धमकी देणारं पत्र ठेवण्यात आलं होतं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

साधारण २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये रात्री विश्रांती घेतील. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकार खोडसाळपणाचा असू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

२० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा

देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. त्यात राहुल गांधी सहभागी झाले आहेत. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात असून, २० नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचेल.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे." असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

Bharat 6G: भारताकडून 6G साठी मोठं पाऊल, इंटरनेटचा स्पीड आणखी वाढणार; युरोप इंडस्ट्री अलायन्ससोबत करार होणार?

SCROLL FOR NEXT