नारायण राणे यांच्यासह 'या' नेत्यालाही मिळणार केंद्रीय मंत्रिपद ?
नारायण राणे यांच्यासह 'या' नेत्यालाही मिळणार केंद्रीय मंत्रिपद ? Saam Tv
देश विदेश

नारायण राणे यांच्यासह 'या' नेत्यालाही मिळणार केंद्रीय मंत्रिपद ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरी २ मंत्रिपदे जवळपास निश्चित झाली आहे. खासदार नारायण राणे आणि कपिल पाटील यांना दिल्लीवरुन तातडीने फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्रातून सध्या नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे तीन केंद्रीय मंत्रिपद सांभाळत आहेत. तसेच राज्यमंत्रिपदाची जबाबदारी रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे सांभाळत आहेत. सध्या महाराष्ट्रात ६ केंद्रीय मंत्रिपदे आहेत. यामध्ये आणखी २ मंत्रिपदाची भर पडणार हे निश्चित झाले आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार की राज्यमंत्रिपदाची जबाबदारी हे अद्याप स्पष्ट नाही.

नारायण राणे आणि कपिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई आणि केडीएमसी महानगरपालिकेच्या दृष्टीने या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे ,नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मात्र, यांना अद्याप दिल्लीवरुन बोलावणे आल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Kal Maharashtra | कल महाराष्ट्राचा दिंडोरीचा खासदार कोण होणार...

Ghatkopar Hoarding News | घाटकोपर दुर्घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ

Latur Water Crisis: लातुरात पाणीप्रश्न गंभीर! पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांचा अवस्था बिकट

Coconut Water: रिकम्या पोटी नारळ पाणी पिण्याचे फायदे काय?

Special Report : प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT