Ramlila Program VIDEO Saam TV
देश विदेश

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

Ramlila Program VIDEO: रामलीला कार्यक्रमात राजा दशरथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा स्टेजवरच दुर्दैवी मृत्यू झाला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात रामलीलादरम्यान हृदयद्रावक घटना घडली.

  • ७३ वर्षीय अमरेश यांचा स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

  • दशरथची भूमिका साकारताना सिंहासनावर बसलेले असतानाच त्यांनी प्राण सोडले.

  • या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रामलीलाचा कार्यक्रम सुरू असताना एका कलाकाराचा स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आपली भूमिका साकारत असताना सिंहासनावरच या कलाकाराने प्राण सोडले. क्षणभर कुणाला नेमकं काय झालं हेच काळाले नाही. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामलीलामध्ये राजा दशरथ यांची भूमिका साकारणाऱ्या ७३ वर्षीय अमरेश या कलाकाराचा स्टेजवरच मृत्यू झाला. ते सिंहासनावर बसले होते. दशरथ दरबारची दृश्य रामलीलामध्ये कलाकार दाखवत होते. अचानक राजा दशरथची भूमिका साकारणाऱ्या अमरेश यांना चक्कर आली आणि ते शेजारी बसलेल्या दुसऱ्या कलाकाराच्या अंगावर पडले. कार्यक्रम सुरू होत असताना अमरिश यांनी आपल्या छातीमध्ये दुखत असल्याचे सांगितले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा मृत्य झाला. रामलीला पाहायला आलेले काही प्रेक्षक आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत होते. त्यांच्या मोबाईलमध्ये अमरेश यांचा लाईव्ह व्हिडीओ कैद झाला आणि तो आता व्हायरल होत आहे.

सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे अमरेश यांनी रामलीला सुरू होण्यापूर्वीच सांगितले होते की माझी शेवटची भूमिका असेल. ते गेल्या अनेक वर्षांपासून रामलीलामध्ये दशरथची भूमिका साकारत होते आणि या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी देखील मिळाली होती. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना देखील प्रभावित केले होते. अमरेश यांच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या कलाकाराने भूमिका करताना स्टेजवरच प्राण सोडले यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामलीला समितीने या घटनेबद्दल दु:ख वयक्त केले आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, अमरेश फक्त एक प्रतिभावान कलाकार नव्हते तर लोकांमध्ये धर्म आणि संस्कृती जोडणारे व्यक्तिमत्व होते. या घटनेनंतर संपूर्ण चंबामध्ये शोककळा पसरली आहे. रामलीला पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी अमरेश यांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला त्या सर्वांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

Thursday Horoscope: चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते, ४ राशींचा गुरुवार जाणार खास; वाचा राशीभविष्य

Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी

WhatsApp Translation Feature: WhatsAppचं जबरदस्त अपडेट, आता प्रत्येक भाषेचं होणार भाषांतर, पण कसं? जाणून घ्या...

Marathwada Flood : मदतीच्या किटवर जाहिरातीबाजी, ठाकरेंचा शिलेदार पेटला; सत्ताधाऱ्यांवर केली जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT