PM Narendra Modi saam tv
देश विदेश

PM Narendra Modi Interview: भारतात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला थारा नाही, जी-२० परिषदेपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?

Priya More

PM Narendra Modi News: येत्या ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये जी-२० परिषद (G-20 Conference) होणार आहे. जी-२० परिषदेपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पीएम मोदींनी जी-२- परिषद, रशिया-युक्रेन युद्ध, भारतातील भ्रष्टाचार, जातीवाद आणि सांप्रदायीक वाद या वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोठं वक्तव्य केले आहे.

'जी- २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. भारताला मिळालेल्या अध्यपदाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 'सबका साथ, सबका विकास' हे जागतिक कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते.' असे पीएम नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारताच्या G-20 अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत आणि यापैकी काही 'माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत'. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन आता मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. यामध्ये भारत उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहे. 'सबका साथ, सबका विकास' हे जागतिक कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पीएम मोदींनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'जगाचा दृष्टिकोन आता बदलत आहे. पूर्वी जग जीडीपी-केंद्रित होते. आता ते मानवकेंद्रित होत आहे आणि यामध्ये भारताची मोठी भूमिका आहे. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरू शकते. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातिवाद, सांप्रदायीक वाद यांना आपल्या राष्ट्रीय जीवनात स्थान नाही.'

पीएम मोदी म्हणाले की,'दीर्घकाळ भारताकडे एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिले जात होते. आता तो एक अब्ज महत्त्वाकांक्षी मन आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश आहे. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन होता. आता तो मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. यामध्ये भारत उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहे.'

यावेळी पीएम मोदींनी चीन आणि पाकिस्तानचा देखील समाचार घेतला आहे. काश्मीर, अरुणाचलमध्ये जी-२० परीषद बैठकीवर पाकिस्तान, चीनचा आक्षेप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावला. देशाच्या प्रत्येक भागात सभा आयोजित करणे स्वाभाविक आहे, असे म्हणत त्यांनी चीन आणि पाकिस्तानला टोला लगावला.

'सबका साथ, सबका विकास हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वही ठरू शकते.' असे म्हणत 'भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र असेल. भारतातील भ्रष्टाचार, जातिवादाला स्थान नसेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

तसंच, 'आज भारतीयांना विकासाचा पाया रचण्याची मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षे स्मरणात राहील.', असे पीएण मोदी यांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्धावर पीएम मोदींनी सांगितले की, 'विविध ठिकाणी विविध संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग संवाद आणि मुत्सद्दीपणा आहे.' त्याचसोबत, 'सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी जगाचे सहकार्य आवश्यक आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT