काय सांगता? महिलेने एकाचवेळी दिला 7 मुलांना जन्म  Saam Tv
देश विदेश

काय सांगता? महिलेने एकाचवेळी दिला 7 मुलांना जन्म

एका महिलेने एकाच वेळी ७ मुलांना जन्म दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये एक आश्चर्यजनक प्रकरण समोर आली आहे. जिथे एका महिलेने एकाच वेळी ७ मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे महिलेसह सर्व मुले निरोगी आहेत. या मुलांपैकी ४ मुले आणि ३ मुली आहेत. या मुलांची छायाचित्रेही स्थानिक आरोग्य विभागच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

ही घटना पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या ठिकाणी असलेल्या एबटाबाद शहरात घडली आहे. पाकिस्तान मधून मिळालेल्या वृत्ताच्या अहवालनुसार, या महिलेवर जिन्ना इंटरनॅशनल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलांच्या वडिलांचे नाव यार मोहम्मद आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, जेव्हा पत्नी गर्भवती होती. तेव्हा तपासादरम्यान आम्हाला समजले की एकापेक्षा जास्त मुले आहेत. परंतु ७ मुले आहेत हे माहित नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार की त्याच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या टीमने हॉस्पिटलमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने महिलेवर उपचार करण्यात आले आहे. अल्ट्रासाऊंड अहवालात असे आढळून आले, की महिलेच्या पोटात ५ मुले आहेत. यानंतर हे ठरवले गेले की महिलेचे ऑपरेशन करावे लागणार आहे. सध्या या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ७ मुले एकामागून एक झाली आहेत. महिला आणि मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ही नाईट क्रीम; स्किन होईल नॅचरल ग्लोईंग आणि स्मूद

Induction Vastu Tips: किचनमध्ये इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: SIR संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! २३ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून 'यलो अलर्ट

Mumbai Police: इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले

SCROLL FOR NEXT