डोळ्याचं पातं लवतं न लवत अख्खा संसार गेला पाण्यात वाहून, पाहा व्हिडिओ

सध्या केरळ राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे.
डोळ्याचं पातं लवतं न लवत अख्खा संसार गेला पाण्यात वाहून, पाहा व्हिडिओ
डोळ्याचं पातं लवतं न लवत अख्खा संसार गेला पाण्यात वाहून, पाहा व्हिडिओSaam Tv

वृत्तसंस्था : सध्या केरळ Kerala राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. केरळच्या काही भागात मागील २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे Heavy Raining in Kerala विविध घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता देखील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या विविध भागात पावसाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात येत आहेत. असाच एक व्हिडिओ कोट्टायमच्या मुंडकायम मधून समोर आला आहे.

हे देखील पहा-

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने नदीने रौद्र रुप धारण झाले आहे. या पाण्याच्या वेगाने रस्त्याच्या कडेला बांधलेले एक पक्कं घर सुरुवातीला थोडं वाकतं आणि नंतर संपूर्ण घर नदीत वाहून जातं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घर नदीन कोसळले तेव्हा घरात कुणीच नव्हते.

दरम्यान, केरळ मधील पावसाने कोट्टायम जिल्ह्यात ४० वर्षीय व्यक्ती, त्याची ७५ वर्षीय आई, ३५ वर्षीय पत्नी आणि १४, १२ आणि १० वर्षांच्या ३ मुलींसह कुटुंबामधील ६ सदस्यांचा कोट्टायम मधील कुट्टिक्कल या ठिकाणी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भूस्खलनामध्ये या कुटुंबाचे घर वाहून गेले आहे. शनिवारी ३ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर इतरांचा शोध सुरू आहे.

डोळ्याचं पातं लवतं न लवत अख्खा संसार गेला पाण्यात वाहून, पाहा व्हिडिओ
खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ? ED कडून दुसरं समन्स

दुसरीकडे, केरळ मध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी रविवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन Pinarayi Vijayan यांच्याशी परिस्थितीविषयी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट देखील केले आहे, 'केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोललो आणि केरळ मध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली आहे. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com