बायकोने पोलिस नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्येच रंगेहाथ पकडलं अन् सुरु झाली हाणामारी SaamTV
देश विदेश

बायकोने पोलिस नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्येच रंगेहाथ पकडलं अन् सुरु झाली हाणामारी

आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये भेटायला येणाऱ्या पोलिस पतीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले आणि त्याच हॉटेलमध्ये या नवरा बायकोसह नवऱ्याच्या गर्लफ्रेंडमध्ये जोरदार हाणामारी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ - आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये (Hotel) भेटायला येणाऱ्या पोलिस पतीला (Police Husband) त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले आहे. आणि त्याच हॉटेलमध्ये या नवरा बायकोसह नवऱ्याच्या गर्लफ्रेंडमध्ये देखील जोरदार हाणामारी झाली.

हे देखील पहा -

सदर घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर (UP Kanpur) येथे घडली आहे. महत्वाची बाब अशी की कानपूर पोलिसांनी महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या महिला शक्ति संगम या कार्यक्रमामध्ये सदर इन्स्पेक्टर Inspector सहभागी होणार होते. मात्र तोपर्यंत यांचे हे प्रकरण बाहेर आले आणि पोलीस इन्स्पेक्टरला महाशयांचा खरा चेहरा समोर आला आहे.

हे संर्व घरवाली बाहरवाली प्रकरण कानपूरमधील ग्वालटोली पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीत घडस आहे. या हद्दीत ड्युटीवरती तैनात करण्यात आलेले पोलिस इन्स्पेक्टर अरुण कुमार हे सोमवारी त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत मजा मारत असताना त्यांची पत्नी फार्रुखाबाद येथून आली असता हे दोघे रंगेहात सापडले. त्यानंतर पती पत्नीमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि पत्नीने आपल्या नवऱ्याची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.

यावर पोलीस कमिशनर यांनी ठाणे इन्चार्जकडून त्वरित अहवाल मागवला त्यावेळी अरुण कुमार इन्स्पेक्टर हॉटेल केडी पॅलेसमध्ये Hotel KD Palace थांबले होते. त्यानंतर सदर इन्स्पेक्टर अरुण कुमार याला त्वरित सस्पेंड करण्यात आले आहे. जेव्हा हे इन्स्पेक्टर रंगेहात पकडले गेले. यावेळीच या भागात पोलिसांचा महिला शक्ती संगम कार्यक्रम सुरू होता. तसेच या प्रकरणाबाबत सदर हॉटेल मॅनेजरांनी सांगितले सदर इन्स्पेक्टर हे हॉटेलमध्ये येत असत. तसेच हात-तोंड धुवून जात असत. तर त्यांच्या सहकारी पोलीसांनी सांगितले 'अरुण कुमारसोबत अन्य महिलेच्या प्रकरणातून हाणामारी झाली होती. त्यामध्ये त्याचा हात देखील फ्रॅक्चर झाला होता. या सर्व जबाबाद्वारे कानपूर पोलीस Kanpur Police या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT