नवरात्रीत घरी आली लक्ष्मी, बापाचा आंनद गगनात, एक्स्ट्रा पेट्रोल वाटत क्षण साजरा Saam Tv
देश विदेश

नवरात्रीत घरी आली लक्ष्मी, बापाचा आंनद गगनात, एक्स्ट्रा पेट्रोल वाटत क्षण साजरा

दरम्यान एका पेट्रोल पंपावर ५% ते १०% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पेट्रोल- डिझेलच्या भावात Petrol Diesel Price सतत वाढ होत आहे. सामान्यांकरिता हे भाव तर परवडणारे नाहीत. आज देशात अनेक शहरामध्ये पेट्रोल ११० रुपयांपार तर डिझेलने देखील शंभरी गाठली आहे. दरम्यान एका पेट्रोल पंपावर ५% ते १०% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे, म्हणून ही ऑफर नसून या पाठीमागचे कारण देखील खासच आहे. एका पेट्रोलपंप मालकाने ही ऑफर देऊ केली आहे.

हे देखील पहा-

मध्यप्रदेश मधील बैतूल Madhya Pradesh याठिकाणी हा पेट्रोल पंप आहे, घरी मुलीचा जन्म झाला म्हणून, हे अधिकचे पेट्रोल वितरीत करण्यात येत आहे. बैतूल मधील सेनानी कुटुंबीय त्यांच्या घरी मुलीच्या जन्माचे स्वागत करत आहेत. या नवीन पाहुण्याचे स्वागत करत असताना, त्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल देण्याचे निर्णय घेतले आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांनाही त्यांनी त्यांच्या आनंदात सामील करुन घेतले आहे.

राजेंद्र सेनानी यांच्या घरी भाची शिखा हिचा नवरात्रीमध्ये जन्म झाला आणि घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या जन्माचा सोहळा व्हावा याकरिता त्यांनी थेट अधिक पेट्रोल वितरित करण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल दिले जात आहे. याठिकाणी एखाद्या ग्राहकाने १०० रुपयाचे पेट्रोल खरेदी केलं, तर त्याला १०५ रुपयांचे पेट्रोल देण्यात येत आहे. तर १०० रुपयांपेक्षा अधिकचे पेट्रोल खरेदी केल्यावर १० टक्के एक्स्ट्रा पेट्रोल मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : बदलापुरात रासायनिक कंपनीत बॉयलरला आग

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT