नाशिकमध्ये गरबा कार्यक्रमावर कारवाई, कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष सहभागी...(पहा व्हिडिओ)

कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष सहभागी
नाशिकमध्ये गरबा कार्यक्रमावर कारवाई, कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष सहभागी...(पहा व्हिडिओ)
नाशिकमध्ये गरबा कार्यक्रमावर कारवाई, कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष सहभागी...(पहा व्हिडिओ)अभिजीत सोनवणे

नाशिक : मागील जवळपास पावणे २ वर्षांपासून महाराष्ट्र बरोबरच देशात कोरोना विषाणूने थैमान Corona घातले आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु, विविध सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम टाकण्यात आली आहे. असे असताना देखील नाशिक या ठिकाणी एका रुग्णालयाच्या आवारात मोठ्या दिमाखात गरबा कार्यक्रमाचे Garba dance event आयोजन केल्याची घटना समोर आली आहे.

या कार्यक्रमात नृत्य करण्याकरिता शेकडो तरुण- तरुणींनी हजेरी लावली होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना नियमांचा संपूर्ण फज्जा उडला आहे. यामुळे मुंबई नाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

पहा व्हिडिओ-

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी हॉस्पिटलचे एच आर, मॅनेजर आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल FIR करण्यात आला आहे. या कार्यक्रमस्थळी पोलिसांनी अचानक येऊन धाड टाकल्याने तरुण- तरुणींची मोठ्या प्रमाणात भांबेरी उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशकातील अशोका मेडिकोअर हॉस्पिटल आवारामध्ये गरबा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकमध्ये गरबा कार्यक्रमावर कारवाई, कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष सहभागी...(पहा व्हिडिओ)
Singhu Border: शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला

काल रात्री याठिकाणी मोठ्या आवाजात गाणी लावून गरबा नृत्य सुरू करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास १०० ते १५० महिला- पुरुष सहभागी करण्यात आले होते. आनंदाच्या भरात डान्स करणाऱ्या या महिला पुरुषांचा कोरोना नियमांचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून आले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, शेकडो तरुण- तरुणी एकत्र येत गरबा नृत्य करत आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असून, देखील शेकडोजण एकत्र आले होते. यामुळे कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी, मुंबई नाका पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली आहे. तसेच अशोका मेडिकोअर हॉस्पिटलचे एच आर, मॅनेजर आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com