Singhu Border: शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळच एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याचे खळबळजनक घटना समोर घडली
Singhu Border: शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला
Singhu Border: शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळलाSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळच एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याचे खळबळजनक घटना समोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचा एक हात कापला गेला आणि मृतदेह बॅरिकेडवर लटकवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुंडली पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंघू सीमेवर कुंडली परिसरात एका तरुणाला अज्ञातांनी मारहाण करण्यात आली होती. एवढेच नाही तर हत्येनंतर मृताचा एक हात कापण्यात आला आहे. एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली होती. युवकाचा मृतदेह सापडल्यावर, सिंघू सीमेवर मोठा गोंधळ उडाला होता. मृताचे वय- ३५ च्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

या घटनेमुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह खाली आणला आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सोनीपतचे डीएसपी हंसराज यांनी दिलेल्या माहितीनुसार की, सकाळी ५ वाजेच्या सुमारास कुंडली पोलीस ठाण्यात माहिती मिळाली होती. की शेतकरी आंदोलनाच्या स्टेजजवळ एका व्यक्तीचे हात आणि पाय कापले गेले आणि त्याला फाशी देण्यात आली आहे.

Singhu Border: शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला
परमबीर वसुली प्रकरणात दाऊदच्या साथीदार वाँटेड

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून लोकांची चौकशी करण्यात आली. पण अद्याप काहीही उघड झाले नाही. यासंदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मागील वर्षी २६ नोव्हेंबरपासून हजारो शेतकरी दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी या प्रश्नावर सरकार बरोबर एक- एक लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला एमएसपी हमी देण्यासाठी शेतकरी नवीन कायद्याची मागणी करत आहेत. या विवादात कायद्यांच्या अडथळ्यावर शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या व्यर्थ ठरले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारला त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, कायदा मागे घेतला जाणार नाही, पण दुरुस्ती करणे शक्य आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com