IMD weather update saam tv
देश विदेश

IMD weather update: पुढील ४ दिवस महत्त्वाचे! चक्रीवादळाचा इशारा, IMD कडून या १६ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

India weather forecast: IMD ने दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशसह १६ राज्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जना आणि पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असताना नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देशभरात हवामानाचा रंग सतत बदलताना दिसतोय. यामध्ये काही भागात पावसाची चाहूल आहे तर काही राज्यांमध्ये अजूनही उन्हाचा तडाखा कायम दिसून येतोय. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जना आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यामध्ये पुढचे चार दिवस दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह १६ राज्यांमध्ये जोरदार वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

७० किमी वेगाने वाहणार वारे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील सक्रिय हवामानाच्या घडामोडींमुळे संपूर्ण उत्तर भारतातील हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह धुळीच्या वादळांची शक्यता आहे. यामध्ये बिहारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हवामान विभागाने पटना ते किशनगंज दरम्यान विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलाय.

कशी आहे दिल्ली आणि पंजाबची स्थिती?

राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहणार आहेत. पंजाब आणि हरियाणातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हिसार, अमृतसर आणि लुधियाना या शहरांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात सौम्य हिमवृष्टी आणि पावसामुळे पर्यटकांसाठी हवामान उत्तम असणार आहे.

उकाडा आणि पाऊस

उत्तर भारतात मान्सूनपूर्व परिस्थिती असताना राजस्थानमधील बारमेरमध्ये तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या वर गेलंय. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा धोका आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आदेश

IMD ने लोकांना खराब हवामानाच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिलाय. विशेषतः वीज पडण्याच्या वेळी लोकांना झाडे आणि विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. या हवामानाचे शेतकऱ्यांसाठी संमिश्र परिणाम दिसून येणार आहेत. यामध्ये काही पिकांना पाणी मिळेल, तर दुसरीकडे गारपिटीमुळे नुकसान होण्याची भीती आहे. देशाच्या बहुतांश भागातील हवामानासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT