The Great Khali accident, 
देश विदेश

हायवेवर भीषण अपघात! डब्ल्यूडब्ल्यूई फेम 'द ग्रेट खली'च्या गाडीचा चुराडा; पुढे काय घडलं?

The Great Khali accident : WWE फेम द ग्रेट खली यांच्या फॉर्च्युनरचा हरियाणातील पानिपतजवळ अपघात झाला. इनोवा कारला धडक दिल्यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले; मात्र खली आणि त्यांचा ड्रायव्हर सुरक्षित आहेत.

Namdeo Kumbhar

WWE Fame The Great Khali’s SUV Crashes Into Innova on Panipat Highway : WWE मध्ये भारताचे नाव गाजवणारे आंतरराष्ट्रीय रेसलर 'द ग्रेट खली' उर्फ दिलीप सिंह राणा यांच्या गाडीचा हरियाणातील पानिपतजवळ भीषण अपघात झाला आहे. कुरुक्षेत्राहून सोनीपतच्या दिशेने जात असताना महामार्गावर खली यांच्या फॉर्च्यूनर गाडीची एका इनोवा कारशी जोरदार धडक झाली. सुदैवाने या घटनेत खली आणि त्यांचे ड्रायव्हर पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर महामार्गावर खली यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

दिलीप सिंह राणा कुरुक्षेत्र येथून सोनीपतच्या मुरथल भागाकडे निघाले होते. तिथे त्यांच्या एका नवीन धाब्याचे काम सुरू असल्याने ते पाहण्यासाठी ते आपल्या फॉर्च्यूनर गाडीतून जात होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास पानिपतमधील जीटी रोडवर बाबरपूर वाहतूक पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली. खली यांच्या गाडीच्या पुढे एक इनोवा कार चालली होती. रस्त्यावर साइड घेण्याच्या नादात इनोवा चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागेच असलेल्या खली यांच्या फॉर्च्यूनरची इनोवाला मागून जोरदार धडक बसली.

या धडकेमुळे खली यांच्या फॉर्च्यूनर गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आणि गाडी जागीच बंद पडली. धडक फार तीव्र नव्हती. गाडीत बसलेले ग्रेट खली आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच पानिपत वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण खली यांनी या प्रकरणी इनोवा चालकाविरुद्ध कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल करण्यास नकार दिला. त्यांनी समजूतदारपणा दाखवत इनोवा चालकाला तेथून जाऊ दिले.

अपघातानंतर खली यांची गाडी बंद पडल्यामुळे त्यांनी पानिपतमधील आपले थेरपिस्ट अनिल शर्मा यांना फोन करून बोलावून घेतले. अनिल शर्मा स्वतःची स्कॉर्पियो गाडी घेऊन घटनास्थळी आले. खली सुमारे अर्धा तास हायवेवर थांबले होते, ज्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. त्यानंतर खली स्कॉर्पियो गाडीत बसून सोनीपतच्या दिशेने रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT