शिवसेना नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा डाव? पोलिसांचंच कृत्य CCTV मध्ये कैद; राजकरणात खळबळ

Punjab Police ASI Caught Planting Drugs On CCTV: पंजाबमधील खन्ना येथे शिवसेना पदाधिकारी महंत काश्मीर गिरी यांच्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर संबंधित ASI निलंबित करण्यात आला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.
Shiv Sena leader Kashmir Giri news
Shiv Sena leader Kashmir Giri newssaam tv
Published On: 

घरात ड्रग्ज ठेवून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमधील खन्ना येथे समोर आला आहे. या प्रकरणात घरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला (ASI) निलंबित करण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.

Shiv Sena leader Kashmir Giri news
Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

खन्ना येथील शिवसेना पदाधिकारी महंत काश्मीर गिरी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये साध्या वेशातील एक पोलिस अधिकारी घरातील बेडरूममध्ये जातो आणि गादीखाली एक पाकीट लपवताना दिसत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही वेळातच गणवेशातील पोलिस पथक घरात दाखल होते आणि हेच पाकीट जप्त करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Shiv Sena leader Kashmir Giri news
Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

या घटनेची दखल घेत खन्नाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दर्पण अहलुवालिया यांनी संबंधित ASI ला तात्काळ निलंबित केल्याची माहिती दिली. तसेच पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाकिटातील पदार्थांसह या प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबमध्ये सुरू असलेल्या 'युद्ध नशियां विरुद्ध' अर्थात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत पोलीस दलाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे अहलुवालिया यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी समान असून आरोपी, ड्रग्ज तस्कर किंवा पोलीस कर्मचारी कोणताही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.