Nagpur : नागपूर जिल्ह्यात खळबळ! रस्त्यालगतच्या पुलाखाली 102 काडतुसे, पोलिसांकडून कसून तपास सुरू

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात पुलाखाली 102 काडतुसे आढळली. यामध्ये 52 जिवंत आणि 50 रिकाम्या काडतुसांचा समावेश आहे. जलालखेडा पोलीस तपास करत आहेत.
Nagpur News
Nagpur NewsAI Image
Published On: 
Summary
  • नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात पुलाखाली एकूण 102 काडतुसे आढळली

  • सापडलेल्या काडतुसांमध्ये 52 जिवंत आणि 50 रिकाम्या काडतुसांचा समावेश

  • पोलीस तपास सुरु आहे

नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात रस्त्यालगत असलेल्या एका पुलाखाली तब्बल 102 काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 52 जिवंत काडतुसे, तर 50 रिकाम्या काडतुसांचा समावेश आहे. ही सर्व काडतुसे भारतात तयार झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारसिंगी गावातील रस्त्यालगत असलेल्या पुलाखाली ही काडतुसे आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काडतुसे ताब्यात घेतली. त्यानंतर या काडतुसांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, सापडलेली काडतुसे एकाच ठिकाणी किंवा एकाच काळात तयार झालेली नाहीत. वरणगाव, खडकी तसेच मध्य प्रदेशातील खमरिया येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये या काडतुसांची निर्मिती झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेली ही काडतुसे भारसिंगी गावातील एकाच पुलाखाली कशी पोहोचली, हा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे.

Nagpur News
Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

काही काडतुसे 1975 च्या काळातील, तर काही 1990 च्या आसपास तयार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना संबंधित ऑर्डनन्स फॅक्टरीकडून मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी तयार झालेली ही काडतुसे नेमकी कोणाकडे होती आणि ती येथे कोणी आणून टाकली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Nagpur News
Breaking News : मोठी बातमी! विमानात अचानक तांत्रिक बिघाड, ३ खासदारांसह ६७ प्रवासी करत होते प्रवास

या काडतुसांचा वापर यापूर्वी कुठे झाला होता का, ती कोणाच्या ताब्यात होती आणि ती पुलाखाली आणून ठेवण्यामागे कोणाचा उद्देश होता, याचाही तपास केला जात आहे. मात्र, या काडतुसांबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या तपासातून काडतुसांचा स्रोत आणि ती पुलाखाली ठेवणाऱ्या व्यक्तीची माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.