Breaking News : मोठी बातमी! विमानात अचानक तांत्रिक बिघाड, ३ खासदारांसह ६७ प्रवासी करत होते प्रवास

Kolkata IndiGo Flight News : कोलकाता विमानतळावर इंडिगोच्या 6E 7423 विमानाचे उड्डाणापूर्वीच इंजिन बंद पडले. तीन खासदारांसह ६७ प्रवासी विमानात होते. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द.
Kolkata Indigo Flight Technical Glitch News
Kolkata Indigo Flight Technical Glitch News AI Image
Published On: 

कोलकत्तामधून मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता विमानतळावर इंडिगो एअरलाइनच्या विमानात मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली. उड्डाण करण्यापूर्वीच विमानाचे इंजिन अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या विमानात तीन खासदारांसह किमान 67 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने ही घटना विमान हवेत झेपावण्यापूर्वीच घडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E 7423 क्रमांकाचे विमान कोलकाता येथून शिलाँगला जाणार होते. विमान पार्किंगमधून धावपट्टीच्या दिशेने जात असताना अचानक थांबले. त्यानंतर विमानाचे इंजिन बंद पडल्याचे समोर आले. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ विमानातच थांबावे लागले. डीएमकेचे राज्यसभेतील खासदार पी. विल्सन यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना जवळपास दोन तास विमानात बसून राहावे लागले. त्यानंतर वैमानिकाने तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

Kolkata Indigo Flight Technical Glitch News
Death News : आई पहाटे ४:३० वाजता उठवायला गेली पण...' लोकप्रिय अभिनेत्याचा झोपेतच मृत्यू,सिनेसृष्टीवर शोककळा

या घटनेनंतर पी. विल्सन यांनी विमान कंपनीवर नाराजी व्यक्त केली. विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि डीजीसीएकडे चौकशीची मागणी केली. विमानांची योग्य तपासणी झाली पाहिजे. विमान कंपनीकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असेल, तर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, विमानात विल्सन यांच्यासोबत आणखी दोन खासदार प्रवास करत होते. मात्र, त्यांनी त्या खासदारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

Kolkata Indigo Flight Technical Glitch News
Breaking News : मोठी बातमी! सलग दुसऱ्यादिवशी आणखी एका आमदाराने दिला राजीनामा; राजकारणात खळबळ

या घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दुसरीकडे, इंडिगो कंपनीलाही सध्या वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. इंधनाच्या किमती वाढणे आणि रुपयाचे मूल्य घसरणे यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. कंपनीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 1,879.1 कोटी रुपयांचा तोटा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.