Saam Tv
सकाळची सुरुवात रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी किंवा लिंबू पाण्याने करा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि सुस्त झालेली पचनसंस्था सक्रिय होते.
रोजच्या जेवणात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि अखंड तृणधान्यांचा समावेश करा. यात भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर ठेवते.
वेळेवर न जेवण्याची सवय पोटासाठी अत्यंत हानिकारक आहे. दररोज एकाच वेळी जेवल्यास शरीराची पचनसंस्था सुरळीत चालते आणि गॅस व ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
घाईघाईने अन्न गिळण्याची सवय टाळा. अन्न जितक्या हळूहळू आणि चांगले चघळून खाहाल, तितके ते पचायला सोपे जाईल.
पोटातील गुडबॅक्टेरिया वाढवण्यासाठी दही, ताक आणि फर्मेंटेड पदार्थांचे सेवन करा. यामुळे पचन मजबूत होते आणि पोट निरोगी राहते.
शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि अन्नाची पचनक्रिया सुधारते.
पोट निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर सक्रिय राहणे आवश्यक आहे. दैनंदिन रुटीनमध्ये हलका व्यायाम, योगासने किंवा चालण्याचा समावेश करा.
जास्त ताणतणाव आणि अपूर्ण झोपेचा थेट परिणाम पोटावर होतो. यासाठी दररोज ७ ते ८ तासांची गाढ झोप घ्या आणि मानसिक शांततेसाठी योगा किंवा मेडिटेशन करा.
NEXT : तूप की तेल, हृदयासाठी सुपरहेल्दी काय? हार्ट अटॅकचा टळेल धोका