Shreya Maskar
आजकाल प्रत्येक घरात एकतरी हार्टचा रुग्ण असतो. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तेल की तूप काय खावे, जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयाची समस्या असलेल्या लोकांसाठी तुपापेक्षा खाद्य तेल सामान्यतः अधिक फायदेशीर असते, कारण त्यामध्ये असंतृप्त चरबीचेप्रमाण जास्त असते, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
ऑलिव्ह, मोहरी, राइस ब्रॅन आणि शेंगदाणा तेलासारख्या तेलांमध्ये मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड चरबी भरपूर प्रमाणात असते. ही चरबी रक्तातील लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
वनस्पती-आधारित तेलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी फॅटी ऍसिडस् असतात, जे रक्तवाहिन्यांचा दाह कमी करतात आणि धमन्या लवचिक ठेवतात.
रोजच्या स्वयंपाकासाठी ऑलिव्ह तेल, मोहरीचे तेल किंवा राइस ब्रॅन तेलासारखी हृदयासाठी अनुकूल तेले वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्याने दर २ ते ३ महिन्यांनी स्वयंपाकाचे तेल बदला.
हृदयविकाराची समस्या असलेल्या लोकांनी १ छोट्या चमच्यापेक्षा जास्त तेल खाऊ नये. तसेच चांगले आणि ताजे तेल वापरावे.
तुपामध्ये प्रामुख्याने संतृप्त चरबी असते. संतृप्त चरबीच्या अतिसेवनामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि कालांतराने धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास हातभार लागतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.