Attack on Gorakhnath Temple Saam Tv
देश विदेश

गोरखनाथ मंदिरावरील हल्ला दहशतवादी कट असल्याचा संशय; ATS चा तपास सुरू...(पहा Video)

गोरखनाथ मंदिरामध्ये पीएसी जवानांवर झालेल्या हल्ल्यामागे दहशतवादी (Terrorist) कारस्थान असू शकणार आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: गोरखनाथ मंदिरामध्ये (Gorakhnath Temple) पीएसी जवानांवर झालेल्या हल्ल्यामागे दहशतवादी (Terrorist) कारस्थान असू शकणार आहे. या घटनेचा दहशतवादी संबंध असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान, यूपी सरकारने (government) या घटनेचा तपास एटीएसकडे सोपवला आहे.

पहा व्हिडिओ-

मुंबईतून इंजिनीअरिंग केलेल्या मुर्तझा या आरोपीने मुख्यमंत्री (CM) योगींच्या मठाबाहेर सुरक्षा रक्षकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला (Attack) केला होता. यावेळी तो धार्मिक घोषणा देखील देत ​​होता. धारदार शस्त्रांचा वापर करत त्याने मंदिरात देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त महासंचालक (एडीजी) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने जबरदस्ती मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

हे देखील पहा-

अहमद मुर्तजा अब्बासी असे आरोपीचे नाव असून तो गोरखपूरचा रहिवासी आहे. एडीजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एडीएसकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. गोरखपूरचे एसएसपी विपिन टाडा म्हणाले आहे की, आरोपींनी धार्मिक घोषणा देत गोरखनाथ मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु, पोलिसांनी त्याला रोखले. सध्या २ जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. एसएसपी पुढे म्हणाले की, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०१ (हत्येचा प्रयत्न) शिवाय इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या घटनेचा निषेध केला असून सरकारने या घटनेची दखल घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT