देश विदेश

Actor Vijay Rally Stampede : १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू, ५१ जण ICU मध्ये, थलापति विजयच्या रॅलीत अनर्थ

Actor vijay rally stampede Update News : अभिनेता विजय याच्या राजकीय रॅलीमध्ये शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. यामध्ये ३९ जणांची जीव गमावला आहे. काही जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. या दुर्घटनेनंतर देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Tamil Actor Vijay Rally Stampede Live News Update : तामिळ सुपरस्टार थलापति विजय यांच्या करूरमधील रॅलमध्ये शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १३ पुरूष, १७ महिला, ४ मुलं अन् ५ मुलींचा समावेश आहे. तब्बल ५१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. काही जणांना प्रथामिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे. उपचार घेत असणाऱ्यांची परिस्थइती पाहाता मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

करूरमधील विजयच्या रॅलीमधील चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेनंतर देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यापासून देशभरातली सर्वच नेत्यांनी या दुर्घटनेवर खेद, दुख व्यक्त केलेय. तामिळनाडू सरकारकडून मृताच्या कुटुंबियांना १० लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एमके स्‍टालिन यांनी करूरमध्ये जात घटनास्थळाची पाहणी करत मदत करण्याच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री स्टॅलिन काय म्हणाले ?

करूरमध्ये झालेल्या या दुर्घटनेला शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे खूपच दु:खद आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दिली. राजकीय प्रचारात याआधी राज्यात अशी कधीच दुर्घटना झाली नाही. आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झालाय तर ५१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विजय उशिरा आला अन् गर्दी वाढत गेली

१० हजार लोक येण्याचा अंदाज होता, पण ३० हजारांच्या आसपास लोक रॅलीमध्ये पोहचले. पोलिसांनी सांगितले की, अभिनेता विजय यांचे आगमन उशिरा झाले, त्यामुळे गर्दी वाढतच गेली. विजय यांचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार होता. पण ते सात वाजण्याच्या आसपास पोहचले. विजय यांच्या आधीच्या रॅलीतील गर्दी पाहून आम्ही खबरदारी घेतली होती. पण अपेक्षापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिले. ५०० पेक्षा जास्त पोलीस तैणात करण्यात आले होते. जितके लोक आले होते, त्यांच्यासाठी पुरेसे पाणी अन् जेवण उपलब्ध नव्हते. दुर्घटनेनंतर २ हजार पेक्षा जास्त पोलीस तैणात करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटेनेसाठी चौकशीची समिती गठीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

HBD Ranbir Kapoor : रणबीर कपूर की आलिया भट्ट सर्वात जास्त श्रीमंत कोण?

Maharashtra Live News Update : झाडांवर सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब, शेतकरी हतबल

Valuj Rain : वाळुज शहरात रात्रभर संततधार; तुर्काबाद खराडीत पाणीच पाणी, शेतातील पिके आडवी

डोक्यावर कर्जाचं ओझं; पत्नीनं विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं, अंत्यसंस्कार उरकून पतीनंही विहिरीजवळ गळफास घेतला

SCROLL FOR NEXT