Maharashtra Rain : राज्यावर पावसाचे संकट कायम, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update Today mumbai palghar raigad red alert : महाराष्ट्रात आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain
Maharashtra mumbai pune Weather Update Today
Published On

Maharashtra Rain Update Live News : दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, बीडसह मराठवाड्यातील काही भागात सध्या पूरस्थिती परिस्थिती कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यासह पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.

कशामुळे राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय?

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाने जोर धरला आहे. पुढील ४८ तास राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Maharashtra Rain
कर्माधिकारी शनिदेव चाल बदलणार, ३ राशींचे आयुष्य बदलणार, पाहा काय होणार फायदा

मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला

संभाजीनगर, जालना, बीड, परभणीमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पालघरमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेताला तळ्याचे रूप आले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या घराला वेडा पडला आहे. घरामध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागातील ओढे नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून रस्त्यावरूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.

Maharashtra Rain
Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट, वाचा...

रेड अलर्ट -

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा

ऑरेंज अलर्ट -

रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा

यलो अलर्ट -

नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा

Maharashtra Rain
पाकिस्तानविरोधात भिडण्याआधी सूर्यादादाचे टेन्शन वाढलं, हार्दिकसह हुकमी एक्का दुखापतग्रस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com