कर्माधिकारी शनिदेव चाल बदलणार, ३ राशींचे आयुष्य बदलणार, पाहा काय होणार फायदा

Shani Rashi : शनिदेव १३८ दिवसांनंतर २८ सप्टेंबर २०२५ रोजी आपली चाल बदलणार आहेत. या बदलाचा सर्वाधिक फायदा धनु, कर्क आणि मिथुन राशींना होणार असून धनलाभ, सुख आणि शांती मिळण्याची शक्यता आहे.
Shani Uday 2025
Shani Uday 2025saam tv
Published On

Saturn Horoscope Shani Rashi Bhavishya 2025 : न्याय व कर्माचे अधिपती शनिदेव १३८ दिवसानंतर आपली चाल बदलणार आहेत. वक्री गतीतून निघाल्यानंतर शनि देव आपली चाल बदलणार आहेत. या बदलमुळे तीन राशींच्या नशिबावर सर्वाधिक फायदा होणार आहे. काही राशींसाठी धनलाभ संभवतो तर काही राशींच्या आयुष्यात सुख अन् शांती येण्याची शक्यता आहे. शनि चाल बदलणार असल्यामुळे राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

कर्माधिकारी शनिदेव प्रत्येकवर्षी आपली चाल आणि नक्षत्र बदलत नाहीत. सध्या शनिदेव वक्री गतीमधून बाहेर येणार आहेत. ते पुढील काही दिवस एका दिशेने सरळ चाल करणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा धनु, कर्क अन् मिथुन राशीला होणार आहे. कर्माधिकारी शनिदेव यांची चाल बदलल्याने सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात काहीतरी बदल घडतोच. काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. २७-२८ सप्टेंबर रोजी शनिदेव आपली चाल बदलतील. तर २८ नोव्हेंबर रोजी शनिदेव वक्री गतीतून मार्गी होतील, असा अंदाज आहे. २८ तारखेपासून शनिदेव सरळ चालणार आहेत. याचा नेमका काय फायदा होणार, याबाबत पाहूया...

Shani Uday 2025
Crime : बायकोनं दीरासोबत संसार थाटला, नवऱ्याची सटकली; घरात घुसून सासूची केली हत्या

धनु राशि

  • नोव्हेंबर महिन्यात शनिचा गोचर धनु राशीसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो.

  • कुटुंब आणि मित्रांशी नाते अधिक दृढ होईल.

  • व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

  • आयुष्यातील चालू असलेल्या अडचणी कमी होऊ लागतील.

  • समजूतदारपणे करिअरशी संबंधित निर्णय घेणे उत्तम राहील.

  • आत्मविश्वास वाढेल आणि सकारात्मक राहाल.

कर्क राशि

  • नोव्हेंबर महिन्यात शनिचा गोचर कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो.

  • आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल.

  • करिअरमध्ये यश मिळेल.

  • जोडीदारासोबतच्या अडचणी दूर होऊ शकतात.

  • आरोग्यातही सुधारणा होईल.

  • पगारात वाढ होऊ शकते.

Shani Uday 2025
Laxman Hake : अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला, मनोज जरांगे म्हणाले...

मिथुन राशि

  • नोव्हेंबर महिन्यात शनीचा गोचर मिथुन राशीसाठी शुभ मानला जात आहे.

  • कामावर लक्ष केंद्रित राहील.

  • पैसे कमावण्याचे नवे मार्ग सापडतील.

  • कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल.

  • नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

  • नशीबाची पूर्ण साथ मिळेल.

डिस्क्लेमर: वरील लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com