अभिनेत्यापासून राजकारणी झालेले थलापती विजय तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्यपालांनी शनिवारी तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण पाठवलं. टीव्हीकेने राज्यात सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमाताचा आकडा गाठला. सहकारी पक्षांच्या पाठिंब्यानंतर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची आज, संध्याकाळी साडेसहा वाजता भेट घेतली. विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तमिळनाडूत नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टीव्हीके प्रमुख विजय यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लोकभवनच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), व्हीसीके यांच्या पाठिंब्यामुळं १२० आमदारांचा टीव्हीकेला पाठिंबा मिळाला आहे. मॅजिक फिगर गाठल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याचा टीव्हीकेचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होणार आहेत. रविवारी किंवा सोमवारी विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तमिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी निवडणूक झाली. बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. टीव्हीकेने पहिल्याच निवडणुकीत जबरदस्त कामगिरी केली. १०८ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतापासून काही पावलं दूर राहिला. पक्षप्रमुख विजय दोन जागांवर निवडणूक लढले. दोन्ही ठिकाणी ते निवडून आले. नियमानुसार त्यांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेच्या आमदारांची संख्या १०७ राहील. विधानसभा सदस्यांची एकूण संख्या २३३ राहील.
बऱ्याच राजकीय घडामोडींनंतर टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता आला. पाच सहकारी पक्षांच्या आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. १३ आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची एकूण संख्या १२० वर पोहोचली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.