Security forces surround the school premises in Thailand’s Songkhla province after a deadly shooting that claimed 34 lives. saam tv
देश विदेश

Thailand shooting: १८ वर्षीय मुलाकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; २२ विद्यार्थ्यांसह ३४ जणांचा मृत्यू

Mass Shooting in Thailand School: थायलंडच्या सोंगखला प्रांतातील एका शाळेत १८ वर्षीय तरुणाने गोळीबार केला आहे. यात २२ मुलांसह ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर त्याच्या बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकाचा शोध घेत होता.

Bharat Jadhav

  • थायलंडमधील शाळेत १८ वर्षीय तरुणाचा अंदाधुंद गोळीबार

  • २२ विद्यार्थ्यांसह ३४ जणांचा मृत्यू

  • शिक्षक-विद्यार्थी वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती

थायलंडमध्ये भयानक घटना घडली आहे. येथील सोंगखला भागातील एका शाळेत १८ वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला असून यात २२ विद्यार्थ्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, काही दिवसापूर्वी शाळेतील एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीला फटकारलं होतं. ही विद्यार्थिनी हल्लेखोराची बहीण होती.

त्याचा राग मनात धरत हल्लेखोराने शाळेत गोळीबार केला. हल्लेखोर त्याच्या बहिणीला रागावणाऱ्या शिक्षकाचा शोध घेत होता. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की त्या माणसाची बहीण त्याच शाळेत शिकत होती. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी शाळा बंद केली असून संपूर्ण परिसरात कर्फ्यू करण्यात आलाय.

गोळीबारानंतर हल्लेखोराने अनेक मुलांना आणि शिक्षकांना ओलीस ठेवले. अनेक विद्यार्थी अजूनही शाळेत अडकल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच विशेष दल आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. पोलिसांनी संपूर्ण शाळेला वेढा घातला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हल्लेखोराची ओळख अद्याप समजलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT