Thai F-16 fighter jet launched an airstrike on a Cambodia-based casino, intensifying the Thailand–Cambodia military conflict. Saam Tv
देश विदेश

थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप,राष्ट्रपती म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार

Thailand Cambodia Conflict: थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्षाचा भडका उडालाय. सोमवारी पहाटे थायलंडने एफ-१६ फायटर या लढाऊ विमानातून कंबोडियातील एका कॅसिनोवर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटलाय. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मीच युद्ध थांबवेन, असं विधान केलंय.

Omkar Sonawane

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातला संघर्ष थांबता थांबत नाहीये. आता तर थायलंडने कंबोडियातल्या एका कॅसिनोवर हल्ला करत थेट युद्धाचा इशाराच दिलाय. पूर्वी कॅसिनो असलेली ही जागा कंबोडिया लष्कराचा तळ असून तिथं शस्त्रास्त्रे, ड्रोन ठेवली जात असल्याचा आरोप करत थायलंडने हा हल्ला केला गेला. यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पेटला.

हा संघर्ष थांबवण्यासाठी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतलाय. मी एक कॉल करेन आणि दोन्ही देशातील युद्ध थांबवेन असं विधान ट्रम्प यांनी केलय. पेनसिल्व्हेनियामध्ये सभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलंय. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भही दिलाय. पाहूयात ट्रम्प नेमकं काय म्हणाले आहेत.

मागील दहा महिन्यांच्या काळात मी आठ युद्धे संपवली. यात कोसोवा-सर्बिया, पाकिस्तान आणि भारत याचाही समावेश आहे. इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथियोपिया, आर्मेनिया आणि अझरबैजान हे सगळेही आमने-सामने आले होते. आता कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले सुरू केले आहेत. उद्या मला एक कॉल करायचा आहे. मी एक कॉल करेन आणि दोन खूप ताकदवान देश थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवणार आहे.

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्षामध्ये आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दोन्ही देशात मे महिन्यात पाच दिवस संघर्ष चालला होता. त्यात 30 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला होता. त्यानंतर 8 डिसेंबरपासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झालाय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांमध्ये यशस्वी मध्यस्ती करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT