Pakistan Terrorist Attack social media
देश विदेश

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानमधील हवाई तळावर आत्मघातकी हल्ला; भिंत ओलांडून घुसले होते ९ दहशतवादी

Pakistan Attack: या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए- जिहाद पाकिस्तानने घेतलीय.

Bharat Jadhav

Pakistan Terrorist Attack:

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या मियांवली हवाई तळावर आज सकाली दहशतवादी हल्ला झाला. सशस्त्र आत्मघाती हल्लेखोर हवाई दलाच्या प्रशिक्षण तळात घुसत त्यांनी इंधन टॅकर आणि तीन विमानांना नष्ट केली. दरम्यान पाकिस्तानच्या सैन्याने भिंत ओलांडून आलेल्या ९ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. (Latest News)

या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए- जिहाद पाकिस्तानने घेतलीय. ठार झालेले दहशतवाद्यांनी हवाई तळाच्या संरक्षण भिंतीला सिडी लावून ते आतमध्ये घुसले होते. जिओ न्यूजला पाकिस्तानी हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. हवाई दलाच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोहीम राबवत ९ दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यात एक इंधन टॅकर आणि तीन विमानांचं नुकसान झालंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तहरीक-ए-जिहाद एक दहशतावादी संघटना आहे. ही एक घोस्ट संघटना आहे, कारण या दहशतवादी संघटनाविषयी अधिक माहिती कोणालाच नाहीये. याआधी तहरीक-ए-जिहादने चमन, बोलान, स्वातच्या परिसरात झालेल्या लकी मरूतमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय. तर काही माध्यमांच्या मते, या संघटनेचा काही हल्ल्यांमध्ये समावेश नव्हता, तरीही या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, तहरीक-ए-जिहादला तहरीक-ए- तालिबान पाकिस्तानकडून पाठिंबा मिळतो. टीटीपीला ज्या दहशतावादी हल्ल्यांची जबाबदारी घ्यायची नसते त्या हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-जिहादवर ढकलली जाते. दरम्यान मागील २४ तासात दोन दहशतवादी हल्ले झालेत. याआधी शुक्रवारी रात्री ग्वादरमध्ये २ सैनिकी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात १४ सैनिकांचा मृत्यू झाला होता.

हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानी सैनिक पसनीकडून ओरमाराकडे जात होते. यानंतर या परिसरात दहशतवाद्यांची शोध घेतला जात आहे. याशिवाय शुक्रवारी खैबर पख्तुनवा येथील अनेक भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या आत्मघातकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होते. दहशतवादी या परिसरात लपून बसल्याची माहिती पाकिस्तानच्या गृप्तहेरांनी दिली होती. या चकमकीत दोन दहशतावादी ठार झाले होते तर दोन जण जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT