Jammu and Kashmir Yandex
देश विदेश

Jammu and Kashmir: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानावर दहशतवाद्यांचा हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी

Jammu and Kashmir : श्रीनगरमधील बेमिना भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडलीय. ईदगाह मैदानावर दहशतवाद्यांनी पोलीस निरीक्षक मसरूर वानी यांच्यावर गोळीबार केला होता.

Bharat Jadhav

Terrorist Attack On Security Forces Personnel:

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यात सुरक्षा दलात एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारीची घटना श्रीनगरमधील बेमिना भागात घडलीय. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.(Latest News)

गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा सुरक्षा जवान शोध घेत आहेत. दरम्यान यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजीही एका पोलिसावर गोळीबार करण्यात आला होता, यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी मोहम्मद हाफिज चाड जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काश्‍मीर झोन पोलिसांनी या हल्ल्याबाबत पोस्ट टाकलीय. "दहशतवाद्यांनी बेमिना येथील हमदानिया कॉलनीत राहत असलेल्या पोलीस कर्मचारी मोहम्मद हाफिज चाड, यांचा मुलगा जीएच हसन चाड यांच मुलावर गोळीबार करत त्यांना जखमी केले. दरम्यान सुरक्षा दलाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. गोळीबार झालेल्या परिसरात सुरक्षा जवानांनी घेराव घातलाय. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, मोहम्मद हाफिज चाड हे उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह येथील रहिवासी आहेत. ते सध्या बेमिना येथे राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT