Terrorist Attack in Jammu 
देश विदेश

Terrorist Attack: वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

Terrorist Attack in Jammu: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका भाविकांच्या बसवर गोळीबार केलाय. या हल्यात ९ ते १० जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय.

दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत कोसळली. या गोळीबारत बस चालकाला गोळी लागलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ही ५५ सीटर बस होती आणि ही बस शिवखोडीहून कटराकडे जात होती. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे लोक स्थानिक नसून उत्तर प्रदेशचे भक्त होते. ते शिवखोडीहून कटरा येथे होते. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या घटनेत ३३ जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मात्र प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. संपूर्ण परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

दहशतवाद्यांची ही संघटना राजौरी, पूंछ आणि रियासी जिल्ह्यात लपून बसलीय. बचावकार्यासाठी पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल घटनास्थळी पोहोचलेत. वैष्णोदेवीजवळील शिवखोडी येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन प्रवासी कटरा येथे परतत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT