Navi Mumbai Cyber Crime
Navi Mumbai Cyber CrimeSaam tv

Navi Mumbai Cyber Crime : पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे सांगत दाखविली भीती; ज्येष्ठ नागरिकांची ३२ लाख रुपयात फसवणूक

Navi Mumbai : पुलवामा हल्ल्यात तुमचा सहभाग असल्याचे भासवून तुमच्यावर देशद्रोह आणि ड्रग्स तस्करी सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: पाच वर्षांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे भासवत नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त नागरिकांची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात तब्बल ३२ लाख १३ हजारात फसवणूक झाली आहे. 

Navi Mumbai Cyber Crime
Heat Wave : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४६ अंशावर, नंदुरबारच्या तापमानात वाढ

नवी मुंबईमधील (Navi Mumbai) नेरुळ येथील शरद पाटील (वय ८२) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त इसमाचे नाव आहे. पुलवामा हल्ल्यात तुमचा सहभाग असल्याचे भासवून तुमच्यावर देशद्रोह आणि ड्रग्स तस्करी सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत ही फसवणूक (Fraud) करण्यात आली. आरोपीनी शरद पाटील यांना व्हाट्सअपवर कॉन्फिडेंशियल अग्रीमेंट आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटची बनावट कागदपत्र पाठवून खरी असल्याचे भासवले होते. 

Navi Mumbai Cyber Crime
Heat Stroke : उष्माघाताने परळीत भाजी विक्रेत्याचा मृत्यू; बीड जिल्ह्यातही उष्णतेची लाट

तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल असून वेरिफिकेशन करण्यात येत आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पैसे भरावे लागतील जे वेरिफिकेशन झाल्यावर परत मिळतील; असे सांगून चार टप्प्यामध्ये ही रक्कम स्वीकारण्यात आली. आरोपीकडून वारंवार पैशाची मागणी करण्यात येत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे शरद पाटील यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी (Cyber Police) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com