Nanded Bus Accident : दोन बसची समोरासमोर धडक; १७ प्रवासी जखमी, बस चालकाची प्रकृती गंभीर

Nanded News : कर्नाटक बस देगलूरहुन नांदेडला तर बिलोली आगाराची बस बिलोलीहुन देगलूरकडे येत होती. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलावर वळण रस्ता आहे
Nanded Bus Accident
Nanded Bus AccidentSaam tv

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड- हैदराबाद महामार्गावरील देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलाच्या वळणावर राज्य परिवहन महामंडळाची बस व कर्नाटक राज्याची बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन बसच्या या अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे. 

Nanded Bus Accident
Kalyan Crime : पार्सलचे पैसे मागितल्याने ढाबा चालकावर शस्त्राने हल्ला; वाद सोडवण्यास गेलेला तरूण जखमी

कर्नाटक बस देगलूरहुन नांदेडला (Nanded) तर बिलोली आगाराची बस बिलोलीहुन देगलूरकडे येत होती. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलावर वळण रस्ता आहे. या वळण रस्त्यावर दोन्ही बस समोरासमोर येऊन (Bus Accident) धडकल्या. हा अपघात दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात चालक वाहकासह १७ प्रवासी जखमी झाले आहेत. यात बिलोली आगाराचे बस चालक आर. एम. हादगले हे या अपघातात गंभीत जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

Nanded Bus Accident
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात वादळासह पावसाचा तडाखा; काढणीला आलेल्या केळी बागा उध्वस्त

गंभीर जखमी चालकास पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले. इतर बसमधील जखमीवर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Accident) अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहचले असून या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com