सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पाहा. हे आहे, 18 एकरात पसरलेलं जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय.. इथे काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते. मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय. त्यामुळे दहशतवाद्याच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडलाय... इथूनच भारताविरोधात कट रचले जायचे.
मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल, या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जातायेत. जिवांच्या आकांताने ही दहशतवादी पिल्लावळ सैरावैरा पळतेय. दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाचं भारतीय लष्कारनं घेतलीय.
मात्र भारतविरोधात गरळ ओकरणारा जैश-ए- मोहम्मदचा संस्थापक मसूर अजहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालाय. दहशतवादाविरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानलीय. मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकड्य़ांकडून हाफिज सईदचा थयथयाट करणारा जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय. मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय? असा सवाल आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीणे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच. कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत. हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनचं दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलयं, हे निश्चित...तो, मौत का डर अभी भी जिंदा है...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.