Heat Wave Saam Tv
देश विदेश

Heat Wave Alert : उत्तर भारतात भयंकर उकाडा; राजस्थानमध्ये उष्माघाताने ८ लोकांचा मृत्यू, अनेक भागांना अलर्ट

Heat Wave Alert in Rajasthan : उत्तर भारतात प्रचंड उकाडा जाणवत असून राजस्थानवर सूर्य कोपला आहे. सोमवारी उष्माघातामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

मागील आठवडाभरापासून देशातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. उत्तर भारतात उन्हाचा कडाका वाढला आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे.

राजस्थानावर सूर्य कोपला असून सोमवारी (ता. २७) फलोदीमधे तब्बल ४९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने उष्माघातामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांत राजस्थानात उष्णतेच्या लाटेमुळे तब्बल ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राजस्थानमध्ये पुढील ३-४ दिवस असेच तापमान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही भागांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी देखील उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतही उन्हाच्या झळा बसत आहेत. सोमवारी दिल्लीतील काही भागातील तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. फरीदाबादमध्ये कमाल तापमान ४७ अंश नोंदवले गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत ३० मेपर्यंत उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही.

येत्या ३० मेनंतर उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे आयएमडीने काही राज्यांना पावसाचा इशाराही दिला आहे. पुढील २४ तासांत बांगलादेश आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे.

केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गडगडाटासह काही जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT