Accident; बस- कंटेनरचा भीषण अपघात; जागीच 7 ठार, 13 जखमी Saam Tv
देश विदेश

Accident; बस- कंटेनरचा भीषण अपघात; जागीच 7 ठार, 13 जखमी

मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग ७१९ (NH ७१९) वर बस आणि कंटेनरची जोरदार समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतामध्ये एका महिलेचाही देखील समावेश आहे. जखमींना गोहद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोहद चौक ठाणे परिक्षेत्रात डॉग बिरखडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक बस ग्वाल्हेरहून बरेलीला जात होती.

जेव्हा बस गोहदच्या डांग डोंगरावर पोहोचली, त्यावेळेस बस डंपरला जाऊन धडकली आहे. या अपघातात एका महिलेसह एकूण ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळेस १३ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एसपीसह पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा रुग्णालयात पोहोचला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT