Telangana IAS officers new posting saam tv
देश विदेश

12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Telangana IAS Transfer List 2026 With New Postings: तेलंगणा सरकारने 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जयेश रंजन यांच्यासह विकास राज, नवीन मित्तल आणि इतर अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

तेलंगणा सरकारने बुधवारी राज्यातील 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या फेरबदलात मेट्रोपॉलिटन एरिया अँड अर्बन डेव्हलपमेंट विभगाचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन यांचाही समावेश आहे. त्यांनी रिटायर होण्यासाठीचा अर्ज केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आला आहे. 1992 च्या बॅचचे IAS अधिकारी जयेश रंजन यांची पर्यावरण, वन आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे ईपीटीआरआयच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याआधी हे पद शैलजा रमैयर यांच्याकडे होते.

IAS जयेश रंजन यांच्याकडील कोणते कार्यभार काढले?

जयेश रंजन यांना क्रीडा विभागाचे विशेष मुख्य सचिव, हेरीटेज तेलंगणाचे संचालक तसेच ग्रेटर हैदराबाद, सायराबाद आणि मल्काजगिरी महानगरपालिकांचे विशेष अधिकारी या पदांच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. रिटायरमेंटला 11 महीने शिल्लक असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान मुख्य सचिव संजय जाजू यांनी प्रसिद्ध पत्रकामध्ये इतर वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

कोणत्या IAS अधिकाऱ्यांची कुठे नियुक्ती?

1. IAS विकास राज

1992 च्या बॅचचे अधिकारी विकास राज यांच्याकडे यापूर्वी परिवहन, रस्ते आणि इमारती विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदाची जबाबदारी होती. आता त्यांची ऊर्जा विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. IAS नवीन मित्तल

1996 च्या बॅचचे अधिकारी नवीन मित्तल यांची पंचायत समिति आणि ग्राम विकास तसेच ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरएसएडी विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. IAS ए. वाणी प्रसाद

1995 च्या बॅचच्या अधिकारी ए. वाणी प्रसाद यांच्याकडे क्रीडा विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदाचा आणि हेरिटेज तेलंगणाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

4. IAS शैलजा रमैयर

1997 च्या बॅचच्या अधिकारी शैलजा रमैयर यांची महसूल विभागातील प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

5. IAS राहुल बोज्जा

2000 बॅचच्या अधिकारी राहुल बोज्जा यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाच्या प्रधान सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच ते मागासवर्गीय कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत राहतील.

6. IAS इलंबरिथि

2005 च्या बॅचचे अधिकारी इलंबरिथि यांची परिवहन, रस्ते आणि इमारती विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे.

7. IAS सरफराज अहमद

2009 च्या बॅचचे अधिकारी सरफराज अहमद हे हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाचे (HMDA) महानगर आयुक्त आहेत. त्यांच्याकडे आता महानगर क्षेत्र आणि शहरी विकास विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तसेच ग्रेटर हैदराबाद, सायबराबाद आणि मल्काजगिरी महानगरपालिकांच्या विशेष अधिकारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

8. IAS श्रुती ओझा

2013 च्या बॅचच्या अधिकारी श्रुती ओझा यांची महिला आणि बालविकास तसेच अनुसूचित जाती विकास विभागाच्या विशेष मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

9. IAS एम.डी. मुशर्रफ अली फारुकी

2014 च्या बॅचचे अधिकारी एम.डी. मुशर्रफ अली फारुकी यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

10. IAS डॉ. एस. संगीता सत्यानारायण

डॉ. एस. संगीता सत्यानारायण यांची महिला आणि बालविकास तसेच अनुसूचित जाती विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

11. IAS जितेश व्ही. पाटील

जितेश व्ही. पाटील यांच्याकडे तेलंगणा स्टेट सदर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडचे (TGSPDCL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद सोपवण्यात आले आहे. तसेच तेलंगणा राज्य अक्षय ऊर्जा विकास महामंडळाच्या (TGREDCO) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बहिणीच्या निधनाचा धक्का बसला, दुसऱ्या बहिणीनेही ३ मुलांसह विहिरीत उडी मारली, ६ जणांचा मृत्यू

Friday Horoscope: आज या 4 राशींवर होणार पैशांचा वर्षाव; शुक्रवारचा दिवस कोणासाठी ठरणार लकी

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा मोठा छापा; मुख्य अभियंता लाच घेताना जाळ्यात

Money Plant : घरात मनी प्लांट ठेवताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT