congress  saam tv
देश विदेश

Telangana Election Results: तेलंगणात काँग्रेसची जादू का चालली? काय आहेत कारणे, वाचा सविस्तर

साम टिव्ही ब्युरो

Telangana Election Results:

याच वर्षी झालेल्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. कर्नाटकात सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेस स्वस्थ बसली नाही. काँग्रेसना आपला मोर्चा तेलंगणाकडे वळवला. जेव्हा आंध्रमधून तेलंगणा राज्य वेगळं झालं, तेव्हा केंद्रात यूपीएची सत्ता होती. केंद्रात तेलंगणाला मान्यता देऊनही काँग्रेसचा राज्यात पराभव झाला. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुंसडी मारली. (Latest Marathi News)

सलग दोन टर्म राव यांची सत्ता होती. या वर्षात राज्यात राव यांच्या विरोधात अॅन्टी इन्कम्बसी वाढली होती. कर्नाटकातही भाजपविरोधात रोष होता. कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसने तेलंगणात सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. याच तेलंगणात विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याचं निश्चित झालं आहे. याच तेलंगणात काँग्रेसची जादू चालण्याची कारणे जाणून घेऊयात.

काँग्रेसने यावेळी रेवंथ रेड्डी यांच्यावर पूर्ण जवाबदारी दिली. या संधीचं रेड्डी यांनी सोनं केलं. पूर्वी तेलुगू देशम पक्षाचे आमदार असलेले रेड्डी काँग्रेसवासी झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेड्डी यांच्यावर जबाबदारी दिली, रेड्डी यांनी केसीआर विरोधात आघाडीच उघडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


२०१७ साली काँग्रेसमध्ये आलेल्या रेड्डींकडे २०२१ साली काँग्रेसचं प्रदेशाध्यपद आलं. अनेक स्थानिक विषयांवर रेड्डी यांनी केसीआर यांना धारेवर धरलं. यात केंद्रीय नेतृत्वानेही रेड्डी यांना पाठिंबा दिला. तेलंगणाच्या जनतेलाही रेड्डी यांचं नेतृत्व आवडंल आणि त्यांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं टाकली.

भारत जोडो यात्रा

भारत जोडो यात्रेचा कर्नाटक काँग्रेसला फायदा झाला असं सांगितलं जातंय. आताही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचं सांगण्यात येतं आहे. राहुल गांधी यांनी २७ ऑक्टोबर २०२२ मध्ये तेलंगणात यात्रा सुरु केली.

तेलंगणात राहुल गांधींनी १६ दिवस यात्रा केली. या १६ दिवसांत १९ विधानसभा आणि ७ लोकसभा मतदारसंघ कव्हर केली गेली. राहुल गांधी यांनी तेलंगणात एकून ३७५ किलोमीटर प्रवास केला. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सामान्य जनतेशी थेट संवाद साधला. अनेक विषयांच्या जाणकारांशीही चर्चा केली.

तेलंगणात मॅजित फिगर ६० आहे, आता तरी काँग्रेस ६० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेसचाच विजय होणार असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. आधी कर्नाटक आणि आता तेलंगणा. दक्षिणेकडच्या राज्यात काँग्रेससाठी फिनिक्स मोमेंट ठरला आहे.

आता हा विजय काँग्रेसला महाराष्ट्रात आणि देशात संजीवनी देणारा ठरणारे का? आता पुढच्याच वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीनंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT