तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 चे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. येथील 119 विधानसभा जागांवर काँग्रेस आघाडी घेताना दिसत आहे. तर सत्तेत असलेले मुख्यमंत्री केसीआ यांचा पक्ष बीआरएस पिछाडीवर जाताना दिसत आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने याबाबत चर्चा केली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार म्हणाले की, जर पक्षाला 70 हून अधिक जागा जिंकण्यात यश आले, तर मुख्यमंत्रीपदावरून पक्षातील अंतर्गत कलह समोर येऊ शकतो. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षातील काही नेते असमाधानी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ते पुढे म्हणाले की, जिथे काँग्रेस 65 पेक्षा कमी जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनतो, तिथे मुख्यमंत्री ठरवणे कठीण जाते. कारण हे आव्हान मुख्यमंत्री होण्याची आशा असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांनीच निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत हे सर्व नेते बीआरएसला (BRS) मदत करू शकतात. (Latest Marathi News)
शिवकुमार म्हणाले की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विजयी उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले की, त्रिशंकू विधानसभा झाल्यास बीआरएस आमचे आमदार फोडू शकते. शिवकुमार म्हणाले की, बीआरएस काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रीपद देऊ शकते.
मात्र, निकालात पक्षाला 75 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर अशा सर्व शक्यता आपोआपच संपुष्टात येतील, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, येथील 119 विधानसभा जागांवर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर दिसत आहे. सत्ताधारी बीआरएस 35 आणि भाजप 11 जागांवर आघाडीवर दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.