SDRF boats capsize saam tv
देश विदेश

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Telangana boat accident: तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील बेथुपल्ली तलावात मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या. या दुर्घटनेत १० पोलीस कॉन्स्टेबल बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी डायव्हर्स आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडलीये. बेथुपल्ली तलावात अडकलेल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी अचानक उलटल्या. या दुर्घटनेत १० पोलीस कॉन्स्टेबल बेपत्ता झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे या दोन्ही बोटी उलटल्या. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी डायव्हर्स आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

खम्मम जिल्ह्यातील सथुपल्ली भागात ही दुर्घटना घडली. या भागातील बेथुपल्ली तलावात पाच मच्छीमार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे पथक दोन बोटी घेऊन तलावात गेले होते. पण बचावकार्य सुरू असतानाच जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोन्ही बोटी अचानक उलटल्या.

या घटनेनंतर SDRF चे १० जवान बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी डीप-सी डायव्हर्स आणि बचाव पथकातील कर्मचारी तलावात शोधमोहीम राबवली जातेय. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. खम्मम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास सांगितलंय. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनाही या संपूर्ण घटनेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान यापूर्वी तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातही एक दुर्घटना घडली होती. याठिकाणी दांडिया कार्यक्रमादरम्यान रोषणाईसाठी उभारलेली कमान अचानक कोसळली होती. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.

राज्याच्या मंत्र्यांकडून बचावकार्याचा आढावा

तेलंगणाचे महसूल, गृहनिर्माण तसंच माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी बेथुपल्ली तलावातील दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केलीये. सथुपल्ली मतदारसंघातील बेथुपल्ली तलावात SDRF च्या बोटी उलटल्याच्या घटनेचा सरकारकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेची माहिती घेतली असून SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

SCROLL FOR NEXT