Telangana DG Anjani Kumar Suspended Saamtv
देश विदेश

Anjani Kumar Suspended: उत्साह नडला, 'ती' भेट महागात पडली; तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांचे निलंबन; काय घडलं?

Telangana DG Anjani Kumar Suspended: तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेपत ही कारवाई करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Telangana Assembly Election 2023:

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आलेत. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय संपादन केला. सत्ताधारी बीआरएससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तेलंगणामधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच निवडणूक आयोगाने सर्वात मोठी कारवाई केलीय. तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेपत ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार (Anjani Kumar) यांना आदर्श आचारसंहिता आणि संबंधित आचार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे. ANI ने या याबाबतचे वृत्त दिले आहे. अंजनी कुमार यांच्यासह तेलंगणामधील इतरही पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) निलंबित केलेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये तेलंगणाचे राज्य पोलिस नोडल अधिकारी संजय जैन आणि तेलंगणाचे पोलिस महासंचालक महेश भागवत, नोडल (खर्च) यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलले रेवंत रेड्डी यांच्या घरी भेट देत पुष्प गुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, तेलंगणामधील निवडणुकीत कॉंग्रेसच्या (Congress) ऐतिहासिक विजयामध्ये रेवंत रेड्डी (Revanth Reddi) यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच ते तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

काँग्रेसने 2021 रेवंत यांना मोठी जबाबदारी देत त्यांची तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

Devendra Fadnavis : 'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Jahnavi Killekar: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

SCROLL FOR NEXT