Telangana Assembly Election 2023 119 seats voting today bjp Congress and Brs know all details  Saam TV
देश विदेश

Assembly Elections 2023: तेलंगणा विधानसभेसाठी आज मतदान; ११९ जागांसाठी तिरंगी लढत, भाजप किंगमेकर ठरणार?

Telangana Assembly Election: सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या ११९ जागांसाठी आज म्हणजेच गुरुवारी मतदान होणार आहे.

Satish Daud

Telangana Assembly Election 2023

सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या ११९ जागांसाठी आज म्हणजेच गुरुवारी मतदान होणार आहे. तब्बल २२९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणात एकूण ३५ हजार ६५५ मतदान केंद्र असून ३ कोटी २६ लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. गुरुवारी मतदान झाल्यानंतर रविवारी म्हणजेच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष बाब म्हणजे तेलंगणबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम येथील मतमोजणी याच दिवशी होत आहे.

तेलंगणात बीआरएस, काँग्रेस आणि भाजप या तीन प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर या निवडणुकीची चुरस वाढली आहे. गेल्या १५ वर्षांपासून याठिकाणी बीआरएसची सत्ता आहे. दुसरीकडे काँग्रेस सत्तेसाठी धडपडत आहे.

या निवडणुकीत भाजपने देखील जोरदार प्रचार केला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी अशा बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यामुळे भाजप जरी किंग बनू शकत नाही, पण किंगमेकर बनू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा तेलंगणात सभा घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. तेलंगणात काँगेस ११८, बीआरएस ११९, तर भाजप आणि मित्रपक्ष ११९ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde: जेवढी लीड मिळेल तेवढ्या किंमतीचे गिफ्ट हवं, लाडक्या बहिणीची धनंजय मुंडेंकडे मागणी

Children's Day Special: या बालदिनी मुलांसाठी तयार करा स्वादिष्ट पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

Dhule Accident : भीषण अपघात...बस- दुचाकीची धडक; दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू, बस पूर्ण जळून खाक

Success Story: कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक, फक्त २१ व्या वर्षी IFS अधिकारी, विदुषी सिंग यांचा प्रेरणादायी प्रवास

Childrens Day Special: आईबाप भारी अन् लेकरं त्यांच्यापेक्षाही लयभारी! या बॉलिवूड कलाकारांची मुलं सोशल मीडियावर आहेत प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT