तेलंगणामध्ये 130 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
पीएलजीए बटालियन क्रमांक 1 मधील सदस्यांचा देखील समावेश.
माओवाद्यांनी 124 शस्त्रे आणि 5205 जिवंत दारुगोळा पोलिसांकडे जमा केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमोर 130 माओवाद्यांनी आत्मसर्पण केले. माओवाद्यांची सर्वात घातक तुकडी मानल्या जाणाऱ्या पीएलजीए बटालियन क्रमांक 1 सह तेलंगाना स्टेट कमिटी आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या तब्बल 130 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. या 130 माओवाद्यांनी एके 47, एलएमजी, एसएलआर, इंसास सारख्या 124 घातक शस्त्रांसह तब्बल 5205 जिवंत गोळ्या तसेच अनेक ग्रेनेड आणि यूबीजीएल हे रॉकेट लाँचरसारखे शस्त्र देखील पोलिसांच्या स्वाधीन केले.
काही दिवसांपूर्वीच माओवाद्यांचा विद्यमान जनरल सेक्रेटरी देवजीने तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते, त्याच देवजीच्या सुरक्षा तुकडीतील 10 माओवाद्यांनी सुद्धा आज तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये PLGA बटालियन-1 व बटालियन-2 चे कमांडर एंड्री कलिथराम उर्फ उइके कल्लू, कोरसा लक्कू तसेच डीके एसझेडसी सदस्य चलसानी नवथा उर्फ चंद्रा यांसारखे वरिष्ठ माओवादी नेतेही आहेत.
माओवादी संघटनेच्या तीन प्रमुख घटकांपैकी People’s Liberation Guerilla Army (PLGA) ही महत्त्वाची संघटना होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याचे तेलंगणा सरकारने म्हटलंय. कुटुंबासोबत शांततेत जीवन जगण्यासाठी आणि पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
आत्मसमर्पण करणाऱ्या 130 माओवाद्यांमध्ये सर्वाधिक 42 माओवादी "PLGA बटालियन क्रमांक 1" चे आहेत. तर 30 माओवादी "तेलंगणा स्टेट कमिटी"चे आहेत. 16 माओवादी "सेंट्रल रीजनल कमांड" चे आहेत. तेलंगणामधील रहिवाशी असलेले फक्त 7 माओवादी सशस्त्र माओवादात सक्रिय असल्याचे तेलंगणा पोलिसांनी प्रेस नोटच्या माध्यमातून म्हटले आहे. सात पैकी फक्त एकच माओवादी आता तेलंगणामध्ये सक्रीय आहे. उर्वरित सर्व छत्तीसगड, झारखंड या भागामध्ये सक्रिय असल्याचे म्हटलंय. त्यामुळे एकाप्रकारे तेलंगणा मधून सशस्त्र माओवाद संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.